चल कत्तली करूया
तुझं तू तिकडे अन् माझं मी इकडेरोजचंच झालंय हे घुसमटणंनको निभावूस दुनियादारी;नाहीस तू अबलाअन् नाहीस रणरागिणी आणि दुर्गाही!ह्या फसव्या शब्दावर फिरव तू हातोडा;तू एक मुक्त जीव!इथं रोजच तुझ्या पावित्र्याची घेतली जाईल अग्निपरीक्षाकित्येक सीता ह्या अग्निकुंडात खपल्यामर्यादा पुरुषाची जपत.ठेवू नकोस आदर्श सावित्री, सीता अन् द्रौपदीचा.नको देऊस संस्कृतीच्या गारद्यांपुढे तुझ्या भावनांचा बळी!तू मुक्त हो, स्वाभिमानी हो!!जिवंत ठेव …